कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात ३ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा वंचित बहुजन आघाडी रुग्णांना पाण्याची बॉटल वाटपः दोषींवर कारवाईची मागणी



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात पाण्याची सुविधा पूर्णपणे बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात गंभीर रुग्ण दाखल असतानाही पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत वारंवार डॉक्टर व प्रशासनाला कळवूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप आहे. करण्यात आला या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रुग्णांना पाण्याच्या बॉटलचे वाटप केले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला

आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. यावेळी राजू कांबळे, मोहम्मद अस्लम, दिनेश पाईकराव, जितेश कदम, राजे रणवीर, अमोल पुंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment