प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवठा



भोगावती खोरा प्रतिनिधी -

शहरांप्रमाणेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही अडचणीच्या वेळी त्वरित पोहचता यावे आणि उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये. त्यांनाही वेळेत आणि तत्परतेने उपचार मिळावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ५ नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवण्यासाठी व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंजूर एकूण ९० लाख रुपयांच्या निधीतून या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना या नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्ली (ता. कागल), प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरे (ता. शाहूवाडी), प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण (ता. आजरा), प्राथमिक आरोग्य केंद्र दानोळी (ता. शिरोळ), प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकपुर्ली (ता. राधानगरी) यांचा समावेश आहे. 

याप्रसंगी खासदार मा. शाहू छत्रपती महाराज, खासदार मा. धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर,आमदार मा. अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, आरोग्य व बांधकाम सभापती मा. सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण समिती सभापती मा. शितल प्रवीण यादव, सभापती, पंचायत समिती आजरा सभापती मा. जयश्री गजानन गाडे, नियोजन समिती सदस्य मा.बाबा नांदेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मा. गजानन गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांच्यासह इतर जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment