राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती दिन अत्यंत श्रद्धेने साजरा
भोगावती खोरा प्रतिनिधी -
राधानगरी धरण स्थळ फेजीवडे येथे आरक्षणाचे जनक आणि कोल्हापूर संस्थानचे लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती दिन अत्यंत श्रद्धेने साजरा करण्यात आला.
राधानगरी धरणाची निर्मिती करून या भागाच्या विकासाचा पाया रचणाऱ्या या महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधानगरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ,आणि शाहूप्रेमी जनता उपस्थित होते.
यावेळी राधानगरीचे उपअभियंता श्री.प्रवीण पारकर,अभिजित ताईशेटे ( जि.पसदस्य ) डॉ. चंद्रशेखर कांबळे, पंचायत समिती सदस्य श्री.मोहन पाटील, श्री.चंद्रकांत चौगले, श्री.बशीर राऊत,श्री.सुरेश बचाटे, प्रकाश बालणकर, मारुती टेपुगडे, युवराज कुंभार, दादासो सांगावकर, भरत कासार, वसीम कलोट, महादेव पाटील, महादेव म्हापसेकर, सम्राट केरकर, तानाजी कुंभार, विनोद मोरये, संजय कुंभार, रमेश चांदम, सुरेश आडसुळ,यांच्यासह परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment