ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात मामा व दोन भाचे यांचा दुर्दैवी अंत.



दर्पण न्यूज - नेवासा प्रतिनिधी : नवनाथ घावटे.

    खरवंडी ता - नेवासा येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघाता मध्ये सोनई येथील अभिषेक गणेश दरंदले ( वय वर्षे 16) व विजय गणेश दरंदले (वय वर्षे 14) व रामेश्वर बाळासाहेब मराठे (मामा) रा.खरवंडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    सोनई येथील अभिषेक व गणेश हे दोन सख्खे भाऊ शाळेला सुट्टी असल्यामुळे आपले मामा रामेश्वर मराठे यांच्या घरी खरवंडी येथे गेले होते.दिनांक 27/05/2026 रोजी मराठे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाले असता या दोन मुलांनी मामा सोबत जाण्याचा हट्ट केला.यामुळे मामा रामेश्वर हे या दोन्ही मुलांना ट्रॅक्टर वर बसून घेऊन गेले परंतु नियती च्या मनात वेगळेच होते.शेतात काम करत असताना ट्रॅक्टर बांदाच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटले व या झालेल्या दुर्दैवी घटनेत या तिघांचा मृत्यू झाला.या झालेल्या दुःखद घटने मुळे सोनई सह खरवंडी परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे..


No comments:

Post a Comment