शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर येथे पदविका प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



प्रतिनिधी गजानन चव्हाण 

मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड प्रक्रिया २० मेपासून सुरू झाली असून २२ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे, ऑनलाईन नोंदणी, कागदपत्र पडताळणी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही या केंद्राचा लाभ मिळत आहे.

संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये

• मेकॅनिकल इंजिनिअरिंग • सिव्हिल इंजिनिअरिंग • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग • कॉम्प्युटर इंजिनिअरिंग • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

या शाखांचा समावेश असून विद्यार्थ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि रोजगाराभिमुख शिक्षणामुळे संस्थेची ओळख निर्माण झाली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांसाठी E-Scrutiny व Physical Scrutiny असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अर्ज निश्चित करण्यात येणार आहे.

यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढताना दिसत आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, पात्रता व इतर माहिती संकेतस्थळावर (https://poly26.dtemaharashtra.gov.in/poly_26/home) उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच २४ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी व २ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली.

अधिक माहिती व चौकशीसाठी खालील दुरधनी वर सम्पर्क साधावा

श्री. सतिश खडसे 98602 15716

श्री. सुनील काठोये 79723 91705


No comments:

Post a Comment