जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील शेख वसीम ड्रेसर यांची उत्कृष्ट कामगिरी
रूग्णसेवा, तत्परता आणि संवेदनशीलता आदर्श : रूग्ण व नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव
प्रतिनिधी नारायण सातव ,, अनसिंग :- (ता.२३ ) जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे कार्यरत असलेले शेख वसीम ड्रेसर यांनी आपल्या प्रामाणिक कामगिरीने रूग्णसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.ते नेहमीच आपल्या कामात तत्पर , प्रामाणिक आणि संवेदनशील असतात रुग्णालय होणारे उपचार अधिक सुखकर व्हावेत, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.जखम बांधने ,ड्रेसिंग करणे ,प्लास्टर करणे यासारखी कामे अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वच्छतेच्या नियमाचे पालन करुन ते करतात विशेष म्हणजे रुग्णांशी प्रेमळपणे संवाद साधून त्याचा मानसिक आधार बनण्याचे काम सुद्धा ते करतात .
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून शेख वसीम ड्रेसर यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते.त्याच्या सेवाभावामुळे रूग्णालयाची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच मदत होत आहे रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक केले आहे अशा समर्पित अणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळेच आरोग्य सेवेवर जनतेचा विश्वास दृढ होतो.अशा सेवाभावी कर्मचाऱ्याचा सन्मान झाला पाहिजे तूर्त एवढेच.
*रुग्णाची प्रतिक्रिया*
"शेख वसीम ड्रेसर हे खूप मनमिळाऊ आणि मदतशील आहेत त्यांच्यामुळे उपचारादरम्यान आम्हाला खुप आराम मिळतो ":- एक रुग्ण
" ते वेळेवर येतात ,स्वच्छता पाळतात आणि रुग्णाशी चांगले वागतात ते खरंच कौतुकास्पद आहे ":-रुग्ण नातेवाईक

No comments:
Post a Comment