विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वितरण
पंचायत समिती शिक्षण विभाग कोपरगाव अंतर्गत व तुलसी आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के. बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चास नळी यांच्या संयोजनाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली . या उपक्रमांतर्गत 29 विद्यार्थ्यांना चष्म्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अमोल रणधीर सर, श्री कांतीलाल गुरसळ सर, श्री सचिन ढेकळे सर श्री खिलारी सर, श्री पवार सर श्री कदम सर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री अमोल रणधीर सर होते आपल्या अध्यक्ष भाषणात त्यांनी सांगितले की, या उपक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल व आजच्या काळात विद्यार्थ्यांचे मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या महाविद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या प्रमुख पाहुणे भाषणात श्री गुरसळ सर म्हणाले की आम्ही दिनांक 10.03.2026रोजी 130विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली होती यासाठी तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल पाठक व डॉक्टर संकेत सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास भड व गुरसाळ सर यांनी काम पाहिले होते.यात 29 विद्यार्थ्यांना डोळ्यांची समस्या जाणवली या सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 01.04. 2026 रोजी चष्मा वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख श्रीम. मगर एस. एस. श्री. महानुभाव सर (विस्तार अधिकारी ) श्रीमती अंबिलवादे मॅडम व गट शिक्षणाधिकारी श्रीम. शेख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.आभार प्राध्यापक ढेकळे एस. पी. सर यांनी मानले.

No comments:
Post a Comment