सांगोला - अथणी महामार्गावरील खड्डा मुजवून घ्यावा :नागरीकातून मागणी
सांगोला - अथणी महामार्गावरील खड्डा मुजवून घ्यावा :नागरीकातून मागणी
प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत
जत शहरातून जाणाऱ्या सांगोला - अथणी मागमार्गावर लोखंडी पुलाजवळ एक महिन्यापूर्वी गटार स्वच्छ करण्यासाठी नगर पालिकेने खड्डा काढला होता .काम पूर्ण न झाल्यामुळे तो खड्डा तसेच ठेवण्यात आला आहे त्या खड्या च्या बाजूने बॅरेकेट लावले आहे ह्या महामार्गावरून दररोज हजारो वाहने जातात , अवजड वाहने पण इथून जात असतात तिथेच हा खड्डा असल्यामुळे अनेकदा ट्राफिक जॅम ची समस्या उदभवत आहे .
त्या मुळे इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी वर्ग पण आहे त्यांना देखील ह्याचा त्रास होत आहे शहरातील नागरिकांना देखील ट्राफिक जॅम मुळे अनेकदा त्रास सहन करावा लागत आहे .काही तरी दुर्दैवी घटना घडण्याआधी नगरपालिकेने लवकरात लवकर गटारीचे व्यवस्था करून तो खड्डा मुजवून घ्यावा अशी नागरीकातून मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment