तांदुळवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटप
तालुका प्रतिनिधी : पांडुरंग होडबे
सेनगाव तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन कामगार संघटनेच्या वतीने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
हा उपक्रम संघटनेचे संस्थापक मा. सुधीर कांबळे सर व राष्ट्रीय अध्यक्षा पूनम सरदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, तसेच शालेय समिती अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे हिंगोली जिल्हा सचिव व उपाध्यक्ष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडत त्यांच्या कार्याची माहिती दिली तसेच संघटनेच्या उपक्रमांबाबतही मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

No comments:
Post a Comment