ता. सेनगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी पांडुरंग होडबे
सेनगाव (प्रतिनिधी) – ता. सेनगाव मधील विविध गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावागावांत प्रभात फेरी, अभिवादन कार्यक्रम, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंती दिनाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी, युवकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. काही गावांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेत समाजाला शिक्षण, समता आणि बंधुता यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करण्यात आले.या जयंती उत्सवामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:
Post a Comment