राजकीय क्षेत्रात चर्चा, सहा दशके सांभाळली काँग्रेसची धुरा प्रज्ञा सातव यांना मिळणार मंत्रीपद ?



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

 हिंगोली, जिल्हयाच्या राजकारणात सध्या प्रज्ञा सातव यांच्या एका निर्णयाने मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या बेरजेच्या राजकारणा'ची चर्चा रंगू लागली असून त्यांना आमदारी की सोबत मंत्रीपदही मिळणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे.

जवळपास सहा दशके काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या सातव कुटुंबातून आलेल्या प्रज्ञा सातव यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय पटावर नवी चाल खेळली. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांना दोन वेळा विधान परिषदेची संधी दिली होती. मात्र, चार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच १८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. राजीव सातव यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी" हा निर्णय घेतल्याची भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, त्यांच्या जागेसह १३ मे २०२६ रोजी ९ राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने एकूण १० जागांवर निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जागेवर स्वतंत्र पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीकडे स्पष्ट वर्चस्व असल्याने भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळाल्यास प्रज्ञा यांना आमदारकीचा मार्ग जवळपास मोकळा आहे. एवढेच नव्हे तर आगामी काळात त्यांच्या मंत्रीपदाचीही जोरदार चर्चा रंगू लागली आहे.


पूनर्वसन रखडल्याने मोठी एक्झिट; आता नव्याने संधींची चाहूल

भारतीय जनता पार्टीमध्ये पुनर्वसन होत नसल्याने दोन माजी खासदार आणि एक माजी केंद्रीयमंत्री पक्षाबाहेर पडले. संधी न मिळाल्याने वाढलेली नाराजी अखेर एक्झिटमध्ये परिवतीत झाल्याचे चित्र दिसून आले, मात्र, केंद्रात तिसन्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर आता हिंगोलीत राजकीय पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः रामराव वडकुते याना राज्यसभेची संधी मिळाल्यानंतर इच्छुकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता आगामी काळात कोणाचा नंबर लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गजानन घुगे, उज्वला तांभाळे आणि बाबाराव बांगर यासह अनेक इच्छुक स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे. इच्छुकांना धक्का देत भाजप जुन्या निष्ठावंत नेत्यांना संधी देते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे 


No comments:

Post a Comment