बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा मृत्यू.
बिलोली प्रतिनिधी.
रेतीची वाहतूक करणाऱ्या एका दहा टायरी हायवा वाहनाने स्कुटी वरून जाण-या एकास जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी वरून जाण-या बेळकोणी येथील किशन वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.६ जुन रोजी दुपारच्या सुमारास बिलोली शहरातील नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर घडली आहे. विषेश म्हणजे या अपघातात वाघमारे यांच्या डोक्यावरून रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक गेल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चक्काचूर झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिलोली तालुक्यातील विविध गावांतील रेती घाटावरून मांजरा नदी पात्रातील लाल रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे. रेती घाटातुन रेती भरून या रेती वाहनांद्वारे बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्हा व पर जिल्ह्यातही वाहतूक करण्यात येते. नेहमी प्रमाणे दि.६ रोजी रेती घाटावरून रेती भरून जाणा-या एम एच १२ तु एन ००३२ क्रमांकाच्या दहा टायरी हायवा वाहन चालकाने बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील रहिवासी किशन रामा वाघमारे यांच्या दुचाकी स्कुटीस जोराची धडक दिली. या जबर धडकेत वाघमारे यांच्या डोक्यावरून रेतीने भरलेली गाडी गाडी गेल्यामुळे त्यांच्या डोक्याचा पुर्ण चेंदामेंदा झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिलोली ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.
No comments:
Post a Comment