सामाजिक लेखापरीक्षण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न



 पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी तालुका प्रतिनिधी

महाड : महाराष्ट्र राज्य सामाजिक लेखापरीक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई यांच्या वतीने साक्षरता अभियान अंतर्गत सामाजिक लेखापरीक्षण जनजागृती कार्यक्रम दि. ३० एप्रिल २०२६ रोजी महाड येथील दर्दमंद इंग्लिश मीडियम शाळा, कांबळे तर्फे येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांचे सत्कारपूर्वक स्वागत करण्यात आले. जनसुनावणी पथकामध्ये स्वयंसेवी  संस्थेच्या प्रतिनिधी शिवकर मॅडम, बचत गटाच्या राऊत मॅडम, शिक्षण विभागाचे श्री. सुधीर सकपाळ, अंकेक्षण विभागाचे श्री. दामले सर तसेच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी अंकेक्षण विभागाचे श्री. दामले सर यांनी सामाजिक लेखापरीक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी लेखापरीक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ऑडिट दरम्यान आलेल्या अनुभवांची माहिती दिली. तसेच शाळेच्या उत्कृष्ट कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.

यानंतर छोटेखानी स्वागत समारंभ पार पडला. विशेष म्हणजे पाहुण्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या उपक्रमामुळे कार्यक्रम अधिक आनंददायी वातावरणात पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. पुरकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी विविध उपाय सुचवले. तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

त्यानंतर गटशिक्षणाधिकारी मा. श्री. राजन सुर्वे साहेब यांनी आपल्या भाषणात शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच FLN, AI, इंग्लिश लॅब आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात आली. यामध्ये भौतिक सुविधांचा अभाव, RTE अंतर्गत शैक्षणिक बाबी (CWSN), शाळेतील वीज वापर व उपकरणे, तसेच प्रयोगशाळा संबंधित बाबी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान श्री. जगदीश गायकवाड सर, श्री. बिपीन साळवी सर व गोडमे सर यांनी महत्त्वपूर्ण सूचना व उपाययोजना मांडल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. वैभव कांबळे सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन बीट विस्तार अधिकारी श्री. जगदीश गायकवाड सर यांनी केले.एकंदरीत सामाजिक लेखापरीक्षण जनजागृती कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


No comments:

Post a Comment