पोलीस मित्राचा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करत समजा समोर एक आदर्श.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मंगळवार दि. 22/04/2026 रोजी माना पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी जावेद खान यांचा काल वाढदिवस होता ते काल ड्युटी वर गेले असता, त्यांचे मित्र श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडाचे अध्यक्ष रुग्णसेवक गजानन चव्हाण, जीवन ज्योती ब्लड डोनर ग्रुप चे अध्यक्ष पत्रकार रुग्णसेवक स्वप्नील जामनिक, एकता बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर चे अध्यक्ष रुग्णसेवक रवी माडकर यांनी आपल्या पोलीस मित्राचा वाढदिवस त्याला न सांगता संध्याकाळी बस स्थानक चौक मूर्तिजापूर येथे अकोल्याची ठाकरे ब्लड बँकेची चमू बोलावली व त्यांना माना या गावावरून वरून बस डेपो ला बोलावले, नंतर जावेदभाई तेथे आले असता त्याच्यांच हाताने रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले,
हा प्रसंग एवढा वेगळा होता की जावेदभाई यांना काही वेळ काही समजलेच नाही नंतर सर्व मित्र परिवार या ठिकाणी येऊन त्यांनी रक्तदान करून जावेद भाई यांच्या खुशीला चार चांद लावत, मित्रा प्रती असलेल्या मैत्रीचे पुरावे दिले, आज माझा वाढदिवस हा रक्तदान शिबीर आयोजित करून मला आपण मित्र परिवारानीं एक अनोखी भूतो ना भविष्य अशी ख़ुशी देत सामाजिक बांधिलकी जोपासली, कारण केक कापून वाढदिवस सर्वच करतात पण माझ्या वाढदिवसाला आपण रक्तदान शिबीराचे आयोजन करून मीच प्रमुख पाहुणा व उदघाटक व शिबिरातुन मिळणारे रक्त गरीब गरजू पेशंटला मिळेल व त्याचा भागीदार आपण मला बनविले या बद्दल मी आपला ऋणी आहे असे उदगार काढले,
जो पोलीस भाऊ आपल्या परिवाराला वेळ न देता नेहमी समाजाच्या हितासाठी रात्र दिवस झटत असतो त्या पोलीस बांधवांचा वाढदिवस हा रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करत आहे व केक न कापता,गरजूना रक्त मिळावे व यासाठी आम्ही जावेदभाई चा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत आहो असे त्याचे मित्र आयोजक गजानन चव्हाण, स्वप्नील जामनिक, रवी माडकर यांनी काढले या शिबिरामध्ये डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी पोलीस व जावेदभाई यांचे मित्र परिवार व सर्वांनी रक्तदान केले, उन्हाळयात 'रक्तदानाची भेट' संकल्पनेत जावेद भाई यांच्या मित्रपरिवाराने केवळ केक कापण्यापुरते मर्यादित न राहता, या शिबिराचे नेटके नियोजन केले. या मध्ये श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा,जीवनज्योती ब्लड डोनर ग्रुप व रुग्णसेवा महाराष्ट्र, ब्लड डोनर व हेल्पर ग्रुप मूर्तिजापूर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला, या शिबिरासाठी नितीन टाले, डॉ. विशाल येदवर, संतोष चौधरी, शेखर येदवर, अक्षय चिकणे, भरत वानखडे, यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:
Post a Comment