“देवा मी तुझा कुंभार!”… संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त महागावात भक्तीचा महासागर उसळणार
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
वारकरी संप्रदायातील थोर संत, विठ्ठलभक्तीचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे संत गोरोबा काका यांच्या ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त महागावात भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकल कुंभार समाज महागाव यांच्या वतीने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
मंदिर भूमिपूजनाचा मंगल सोहळादि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आश्विन नगर, एल. के. शाळेसमोर मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. या पवित्र प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संतांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.
सायंकाळी किर्तन व महाप्रसादत्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता सतिश मंगल कार्यालय, महागाव येथे भव्य किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी गुरुवर्य तानाजी बापू यांचे सुमारे ६.३० ते ८.३० या वेळेत कीर्तन होणार असून त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत गोरोबा काका : भक्ती, साधेपणा आणि समतेचा संदेशवारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक असलेले संत गोरोबा काका हे कुंभार समाजात जन्मलेले महान संत होते. त्यांचा जन्म अंदाजे इ.स. १३व्या शतकात झाला. विठ्ठलभक्तीत तल्लीन होत त्यांनी साधेपणातून अध्यात्माचा मार्ग दाखवला.त्यांच्या अभंगांमध्ये भक्तीची गोडी, प्रामाणिक श्रमाची शिकवण आणि समतेचा संदेश दिसून येतो.देवा मी तुझा कुंभार! नासीं पापाचें डांगर या ओवीतून त्यांनी स्वतःला ईश्वराच्या सेवेत अर्पण केले आहे.संत गोरोबा काका यांनी समाजाला सांगितले की, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि संतसंग हीच खरी जीवनाची वाट आहे भगवंताची कृपा मिळविण्यासाठी अहंकाराचा त्याग आवश्यक आहेत्यांचे निधन (पुण्यतिथी) वारकरी परंपरेत अत्यंत भक्तिभावाने स्मरणात ठेवले जाते आणि आजही त्यांच्या अभंगातून समाजाला प्रेरणा मिळते.
आयोजकांचे आवाहन या पवित्र सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा स्वीकार करावा, असे आवाहन सकल कुंभार समाज, महागाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे संतांच्या चरणी लीन होऊन भक्तीचा हा सोहळा महागावात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणार आहे.

No comments:
Post a Comment