येलदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी
सेनगाव (प्रतिनिधी – पांडुरंग होडबे)
येलदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गावातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसर उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेला होता.
या कार्यक्रमाला गावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील खताळ ताई, पोलीस प्रशासनाच्या वतीने बीट अंमलदार चाटसे साहेब व होमगार्ड, वन विभागाचे वनरक्षक चाटसे साहेब, रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन गडदे, विनायक हराळ, पतीग गडदे, ज्ञानेश्वर राठोड, अंबादास चेव्हाण आदी उपस्थित होते.तसेच गावातील महिला मंडळ, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या उपस्थितीत जयंती अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
No comments:
Post a Comment