बाळापूर मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

बससेवेची तातडीची गरज

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर नवीन एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ९ एप्रिल रोजी परभणी विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रस्तावित मार्ग कळमनुरी पार्टी मोड चिंचोर्डी - वंजारवाडी - गोटेवाडी बेलथर - येलकी आखाडा बाळापूर असा असून या मार्गावरील बहुतांश गावे ग्रामीण व दुर्गम भागात येतात. त्यामुळे नागरिकांना कामठा फाटा प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, कामगार व रुग्णांना शिक्षण, आरोग्य सेवा व दैनंदिन कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सोयीसाठी या मार्गावर नियमित बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment