जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी. स्व. विनोद कळंबे यांच्या कुटुंबाचे घरी जाऊन केले सांत्वन.
टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर
जाफ्राबाद तालुक्यातील गारखेडा येथील आदर्श शिक्षक तसेच दैनिक पार्श्वभूमीचे पत्रकार स्व. विनोद बापूराव कळंबे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून मनाला वेदना देणारे आहे.
एका हाताने पिढ्या घडवणारे शिक्षक आणि दुसऱ्या हाताने समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे सजग पत्रकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्यामुळे शिक्षण व पत्रकारिता क्षेत्र समृद्ध झाले होते. त्यांच्या निधनाने या दोन्ही क्षेत्रांची मोठी हानी झाली आहे.
असे जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी स्व. विनोद कळंबे यांच्या गारखेडा येथे निवासस्थानी जाऊन कळंबे कुटुंबियांचे सांत्वन केले. स्व. विनोद कळंबे यांचे मोठे बंधू राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रामधन पाटील कळंबे यांना दिर देत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मन भरून आले असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.
नियतीचा हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या परिवारास देवो, हीच प्रार्थना त्यांनी देवाकडे केली. या वेळी त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे नाना भाऊ देशमुख बापु, सुरेश गवळी, शिवसेना ऊबाटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अजय बनकर सह मविआ चे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment