साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ व नुकसानीची धास्ती
प्रतिनिधी. घनश्याम मोरे साक्री.
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून शेतातील काढणीला आलेल्या पिकांची नुकसानीची दाट शक्यता निर्माण झालेली असून शेतकरी चिंताग्रस्त आहे शेतातील कांदा गहू हरभरा पिके अवकाळी पावसामुळे खराब होऊन याचा शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा गहू हरभरा ही पिके पाण्यापासून वाचवण्यासाठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून जनावरांचा चाराही ओला होऊन तो खराब होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी फार तणावग्रस्त आहे साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील निळगव्हाण विटाई दारखेल नाडसे या गावांना अवकाळी पावसाचा फार मोठा फटका बसून अवकाळी पाऊस दोन ते तीन दिवस राहिल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे
No comments:
Post a Comment