जत मध्ये रमजान ईद उत्साहात साजरी


 प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत 

 जत येथे रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला . जत येथील ईदगाह मैदान परिसरात मुस्लिम बांधवानी सकाळी ठीक 8:30 वा एकत्र येत ईदची नमाज अदा केली . 

यावेळी नमाज पठण मार्कज मस्जिद चे मौलाना खतीब यांनी केले तर खुतबा पठण मौलाना शेख यांनी केले नमाज पठणानंतर देशात एकोपा राहावा हिंदू मुस्लिम यांच्यात एकोपा राहावा अशी दुआ करण्यात आली . दुवा झाल्यावर सर्व समाज बांधवानी एकमेकांना आलिंगन देत "ईद मुबारक "च्या शुभेच्छा दिल्या . धर्म, जात - पात यापलीकडे जाऊन सर्वानी एकोप्याचा संदेश दिला .

 मुस्लिम बांधवाना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी मा . आमदार विक्रम दादा सावंत , आर . पी . आय . चे नेते संजय कांबळे , मा .नगरसेवक निलेश बामणे , नगरसेवक परशुराम मोरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चे सभापती सुजय शिंदे , नागरसेव विकास माने , मिथुन माने , नगरसेवक भैया कुलकर्णी , नगरसेवक महादेव कोळी , श्रीकांत सोनावणे , राष्ट्रवादीचे नेते शफिक इनामदार तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थिती मुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली . सणाच्या पार्श्ववभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जत पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

 पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते

No comments:

Post a Comment