जत हिंदू स्मशान भूमी येथे आगीचे रौद्र अवतार ; विकास माने यांची तत्परता
प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत
आज दुपारी जत येथील हिंदू स्मशान भूमी येथे अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली त्याच वेळी नगरसेवक विकास माने हे त्यांच्या मित्राच्या आजीचे निधन झाले होते त्यांचे दहन असल्याने स्मशान भूमी मध्ये च होते .
विकास माने यांनी तत्परता दाखवत लगेच नगरपालिकेत फोन करून अग्निशमन ची गाडी मागवून घेऊन स्वतः व अग्निशमन चे अधिकारी जीवाची पर्वा न करता तिथे आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आल्या नंतर तेथील आसपास च्या परिसरातील ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला .नगरसेवक विकास माने त्यांचे सर्व मित्र व अग्निशमन दल यांनी जर शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली नसती तर खूप मोठे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत न्हवती .
नगरसेवक विकास माने व त्यांच्या सोबत दिनेश जाधव , मिथुन माने , राघवेंद्र चौगुले , मंटू हैद्राबादे , अमोल चव्हाण , हर्षवर्धन माने , सागर जाधव ह्यांनी देखील आग वीजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले .नगरसेवक विकास माने यांची तत्परता बघून तेथील परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानून त्यांच्या कार्याला सलाम केले .

No comments:
Post a Comment