दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता समन्वय बैठक ....!!!!



 प्रति . पांडुरंग गायकवाड...

दिनांक : ३०/३/२०२६  रोजी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS ) आणि ART विभाग GMCH छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ART विभाग GMCH येथे समन्वय बैठक घेण्यात आली , सदरील बैठक मा. साधना गंगावणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी , जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (DAPCU), तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली ,

सदर बैठकीमध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना शासकीय योजना , संजय गांधी निराधार योजना ,श्रावण बाळ योजना रेशन कार्ड ,  मोफत बस पास इत्यादी विषयावर माहिती देण्यात आली तसेच डॉ.साळवे  ART विभाग प्रमुख यांनी पोषण आहार , नियमित उपचार , आणि व्यायाम याचे महत्व सर्वाना सांगितले तसेच सर्वांनी नियमित उपचार घेणे आवश्यक आहे तसेच भेदभाव आणि कलंक याबाबत ही माहिती देण्यात आली , दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना कोणीही भेदभाव ची वागणूक देऊ शकणार नाही तसेच दुर्धर आजार आहे म्हणून कलंकित करू शकणार नाही, तसेच उपस्थित दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना शासकीय योजना हवी असेल त्यांना मराठवाडा ग्रामीण विकास संस्थे मार्फत लिंक वर्कर प्रकल्प आणि स्थलांतरीत कामगार प्रकल्प अंतर्गत  मदत केली जाईल अशी माहिती देण्यात आली , ४५ ते ५० च्या संखेने लाभार्थी उपस्थित होते तसेच ART विभागातील श्रीमती देशमुख madam , जयकुमार जावळे , अंजली गोसावी , पंकज खरे , MGVS मधील अन्नपूर्णा ढोरे , सुनिता तारगे, ,अर्जुन जगताप वनिता शिनगारे, रुशिका ढेंबरे , श्याम बोधक ,नारायण वाळके , शुभांगी अधाने , आबासाहेब सोनवणे ,  इत्यादी सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले 

No comments:

Post a Comment