विद्यार्थी सुरक्षिततेसाठी पोलीसांचे मार्गदर्शन; जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे जनजागृती कार्यक्रम
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
सोयगाव : जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे आज सोयगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार श्री. संजय सिंगल यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितता व नागरिक सुरक्षा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. वाढत्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदत कशी मिळवावी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आपत्तीच्या काळात पोलीस हेल्पलाईनशी कशा प्रकारे संपर्क साधावा, तसेच आपत्कालीन क्रमांकांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. सी. राठोड यांनी शाळेतर्फे श्री. संजय सिंगल यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment