ग्राहक रक्षक समितीच्या निफाड तालुका सचिवपदी शरद लोहकरे यांची निवड



प्रतिनिधी. :- गणेश ठाकरे, लासलगाव 

भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीच्या निफाड तालुका सचिव पदावर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शरद दामोदर लोहकरे यांची निवड करण्यात आली आहे.


            ही निवड राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉ. सौ. आशाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संभाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केली. या निवडीबद्दल विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यामध्ये राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ. ज्योती केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश मालुंजकर, राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, राष्ट्रीय संघटक ताराचंद ओसवाल, राष्ट्रीय मार्गदर्शक (माजी न्यायाधीश) विजय पाटील, राष्ट्रीय सल्लागार (अन्नधान्य भेसळ प्रतिबंध) अशोक गजानन कुंदप, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कुणाल भोसले, राष्ट्रीय विशेष मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने, राष्ट्रीय सहसंपर्कप्रमुख संतोष रसाळकर आदींचा समावेश आहे.

तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (महिला) जानकी पराग नाईक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. राहत शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विजय साखला, प्रल्हाद तळले, राज्य महासचिव हिरामण शिरसागर, प्रदेश मार्गदर्शक विजया शिंदे, सुरेश काळू गवळी, कायदेशीर सल्लागार (हायकोर्ट ॲड.) मंदार रानडे, महाराष्ट्र वैदिक शास्त्र अध्यक्ष डॉ. पारुल लाड यांच्यासह राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.


महाराष्ट्रातील विविध विभागीय व जिल्हाध्यक्षांनीही लोहकरे यांच्या निवडीचे स्वागत करत सामाजिक कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment