कळमनुरीत भाजपतर्फे जल्लोष माजी आ. रामराव वडकुते यांना राज्यसभेचे उमेदवारी जाहीर



दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी : भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेदवाराच्या यादीमध्टो हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष, माजी आ रामराव वडकुते यांना जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात  जल्लोष साजरा केला.

कळमनुरी येथील जुना बस स्थानक परिसरात असलेल्या राजमाता जिजाऊ चौकामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे यांच्या नेतृत्वात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली

ज्येष्ठ नेते तथा प्रकाश नाईक दिनकर कोकरे, अशोक संगेकर, नारायण हुरे, भागवत ठाकूर, ग्रामीण मंडळाध्यक्ष विठ्ठलराव भोयर, शहर महळ अध्यक्ष ओंकार नावडे, नगरसेवक राजू जाधव, जिल्हा सरचिटणीस उमेश सोमाणी, प्रा गुलाब भोटार, आमिष दरक, शंकर सूर्यवंशी, विक्रम शिंदे, योगेश संगेकर, रुखमाजी शिंदे सूरज शिंदे, विकास ठाकूर, दौलतराव धनवे, जिद्दी पाटील,

इंदेश काबरा, अनिल इंगळे, डॉ सारंग देशमुख, कृष्णकांत शेवाळकर, राहुल मेने, रमेश पाठक याच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment