कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन जाहीर
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू भाऊ कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी अद्यापही अटकेत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ८ एप्रिल २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर प्रकरणाला तब्बल दीड महिना उलटूनही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. यापूर्वी पोलीस उपमहानिरीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र येथे आंदोलन करून विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी तथा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, कळमनुरी यांना करण्यात आले आहे. या वेळी बाबारावजी थोरात (प्रभारी जिल्हाध्यक्ष), मोहम्मद असलम (युवा तालुका अध्यक्ष), लंकेश
आवटे (जिल्हा उपाध्यक्ष), दिनेश पाईकराव (युवा महासचिव), विनोद भाऊ थोरात, जयभीम डोंगरे, दीपक सोनाळे, करण नरवाडे, धम्मपाल पाईकराव, विनोद ढेपे, दादाराव खंदारे तसेच कार्यकर्ते जितेश कदम, भगवान दादा ढेपे, समाधान पाईकराव, गोविंद पाईकराव, सचिन हाटकर, शीलवान नरवाडे आदी निवेदन देताना उपस्थित होते

No comments:
Post a Comment