राज्यातील पहिले खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय परिक्रमा शैक्षणिक संकुलनात सुरू…




श्रीगोंदा प्रतिनिधी :- अशोक राहिंज

        काष्टी ता. श्रीगोंदा येथील मा. नामदार श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा शैक्षणिक संस्थेला शैक्षणिक वर्ष 2026–27 पासून राज्यातील पहिले पशुवैद्यकीय (BVSc & AH) महाविद्यालय सुरू करण्यास केंद्र सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.

            परिक्रमा पशुवैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU), नागपूर यांच्याशी संलग्न असणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले विद्यापीठाचे संलग्नता पत्र, राज्य शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) तसेच केंद्र सरकारकडून मिळणारे परवानगीपत्र (LOP) प्राप्त झाले असून भारतीय पशुवैद्यकीय परिषद (VCI) यांची मान्यताही मिळाली आहे.

       महाविद्यालयात ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी परिक्रमा संस्थेच्या अधिकारी वर्गाने देशातील व परदेशातील विविध खाजगी व सरकारी महाविद्यालयांना भेटी देऊन आवश्यक माहिती संकलित केली आहे.

         महाविद्यालयात अनुभवी शिक्षक कर्मचारी वर्ग , प्रशस्त व स्वतंत्र इमारत, प्रशस्त ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज पशुचिकित्सा दवाखाना, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, खेळाचे मैदान, बस सुविधा आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

         परिक्रमा शैक्षणिक संकुलामध्ये CBSE शाळा, तंत्रनिकेतन, फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, बी बी ए, बी सी ए, एम सी ए, विधी महाविद्यालय तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय होणार आहे.

अधिक माहितीसाठी परिक्रमा शैक्षणिक संकुलास प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. के. एस. रिसम यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment