एटीएम मध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून एक लाख पंधरा हजार हजारांची ' फसवणूक; आरोपी MIDC वाळूज पोलिसांच्या जाळ्यात



पोलीसं कडून नागरिकांना आव्हान :तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई; नागरिकांनी ATM वापरताना सावध राहावे

: दैनिक दर्पण प्रतिनिधी वाळूज महानगर पांडुरंग गायकवाड 

छत्रपती संभाजीनगर : ATM केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे कार्ड बदलून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला MIDC वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. मदतीच्या बहाण्याने ATM कार्ड बदलून सुमारे एक लाख पंधरा हजार  रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशाकांत तुकाराम कदम (वय ४०, रा. लक्ष्मी नगर जय भवानी चौक बजाज नगर) हे २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता वाळूज परिसरातील ATM केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत त्यांचे ATM कार्ड बदलून घेतले. त्यानंतर आरोपीने त्या कार्डचा वापर करून फिर्यादीं च्या खात्यातून एक लाख पंधरा हजार हजार रुपये काढून फसवणूक केली.

या प्रकरणी MIDC वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विकास सचिन करंजकर (वय २७, मुळगाव आंबेजोगाई हल्ली मुक्काम वडगाव कोल्हाटी स्वस्तिक नगर गट नंबर  याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर(परिमंडळ-१) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार अरुण उगले (पो.ना. ५२२), हनुमान कोटे (पो.ना. १३२६), वैभव गायकवाड (पो.ना. १३२४), नितीन इनामे (पो.ना. ११६५), रोहित चिंघाडे (पो.ना. २५७९), आकाश पाटील (पो.ना. ३२३), राहुल गिरी (पो.ना. २२९२), संदीप लाड (पो.ना. २६६०), अविनाश येणे (पो.ना. २५१) तसेच चालक शिवाजी राठोड (पो.ना. १२३४) व वसंत उगले (पो.ना. ९५७) यांनी सहभाग घेतला.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ATM मधून पैसे काढताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. 

No comments:

Post a Comment