देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा चे प्रेमचंद राठोड आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित ..



टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना ) विष्णु मगर

नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार आज दिनांक 23 मार्च 2026  रोजी  देऊळगाव राजा हायस्कूल चे प्रेमचंद राठोड सर यांना सन्मानित करण्यात आले. देऊळगाव राजा हायस्कूल चे विद्यार्थी प्रिय शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने  शाळेच्या वतीने  प्राचार्य श्री आर. बी. कोल्हे, उपप्राचार्य श्री बंड सर ,पर्यवेक्षक श्री जाधव सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री मुळे सर यांनी सत्कार केला. 

 या वेळी सत्काराला संबोधीत करतांना श्री राठोड सरांनी आतापर्यंत 30 वर्षे सेवा केली आणि स्काऊट गाईड मध्ये आतापर्यंत  28 मुलांना  राज्य पुरस्कार प्राप्त करून दिले असुन, विविध उपक्रमांतर्गत साक्षरता अभियान ,व्यसन मुक्ती निर्मूलन, प्रभात फेरी द्वारे जनजागृती करून शाळेचे नाव राज्य स्तरावर नेले असल्याचे शाळेचे प्राचार्य रंगनाथ कोल्हे यांनी सांगितले. 

या वेळी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, कोषाध्यक्ष ,सचिव, संचालक तथा सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले . या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री पेरणे सर यांनी केले .

No comments:

Post a Comment