खासदार वडकुते यांचा डॉ. मस्के यांनी केला सत्कार



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी : महाराष्ट्रातून देशातील सर्वोच्च सभागृह असलेल्या वरीष्ठ सभागृहात राज्यसभा खासदार म्हणून रामराव वडकुते यांची बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते डॉ. दिलीप मस्के व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. अश्विनी मस्के यांनी सत्कार केला.

यावेळी सुरज वडकुते उपस्थित होते. खा. रामराव वडकुते यांच्यासारख्या जेष्ठ सामाजिक व समाजकार्यात अग्रेसर नेतृत्वास राज्यसभेवर निवड झाली यामुळे केंद्राच्या विकास कामे योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी, तसेच विविध प्रश्न सोडवण्यासाठी याचा मोठा उपयोग होईल असे यावेळी डॉ. दिलीप मस्के यांनी सांगितले खा. रामराव वडकुते यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


No comments:

Post a Comment