कळमनुरीत रमजान ईद उत्साहात साजरी ईद निमित्त आ. संतोष बांगर यांच्याकडून मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी: पवित्र रमजान ईदच्या शुभप्रसंगी हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी इदगाह परिसरात भेट देऊन मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना हार घालून तसेच गुलाबाचे फूल देऊन सन्मानित केले.
आमदार संतोष बांगर यांनी आपल्या मनोगतात ईद हा सण प्रेम, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणारा असल्याचे सांगितले. समाजामध्ये एकात्मता व सौहार्द टिकून राहण्यासाठी अशा सणांचे मात्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी
अधोरेखित केले. त्यांच्या या उपक्रमामुळे इदगाह परिसरात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाला कळमनुरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक मोठ्या संख्येनेउपस्थित होते. याशिवाय शहरातील इमाम व मौलाना यांचीही विशेष उपस्थिती होती. सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत इंदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक वी माकोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मान वृद्धिंगत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. इंदच्या या पवित्र सणानिमित्त कळमनुरी शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

No comments:
Post a Comment