श्री आई बाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडाचा उपक्रम पोलीस बांधवाचा रक्तदान शिबीर आयोजित करून वाढदिवस साजरा.

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

 रविवार दि 01/03/2026 रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा,मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन,नेहरू युवा बहू .क्रिंडा  व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी मूर्तिजापूर, एकता बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्दयमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे अवच्युत  साधून मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल मंगेशभाऊ विल्हेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते,  या शिबिराचे उद्घाटक श्री  अजित जाधव सर (पोलीस निरीक्षक मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन)  प्रमुख पाहुणे कैलासभाऊ महाजन समाजसेवक  इब्राहिमभाई घाणीवाला, समाजसेवक रवी माडकर रुग्णसेवक,वसीमभाई  हे होते,सर्व प्रथम मान्यवरांनी श्री .  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  मंगेशभाऊ विल्हेकर यांचा सर्व पाहुण्यांनी सत्कार करून त्यांना वाढदिवस निमित शुभेच्छा देण्यात आल्या , यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण वाढदिवसाला पार्टी व इतर खर्च करतो, परंतु आज वाढदिवसा निमित्त  रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान श्रेष्ठ दान आहे व हे खूपच मोठे कार्य आहे .

 असे कार्यक्रम नेहमी घ्यायला पाहिजे जेणेकरून समाजाचा फायदा होईल, मुर्तीजापुर मध्ये रक्तदान उपलब्ध करून देणारे रवी माडकर,गजानन चव्हाण,विलास वानखडे हे खूप छान कार्य करतात,असे गौरव उदगार ठाणेदार जाधव सर यांनी काढले तसेच या सर्व पाहुण्यांच्या हस्ते श्री आईबाबा बहुऊद्देशिय संस्था  सालतवाडाचे अध्यक्ष श्री गजानन चव्हाण यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, या शिबिराला पोलीस अधिकारी PSI सूर्यवंशी सर PSI राठोड सर, व महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, होमगार्ड अधिकारी राहुल तोडकर सर,सार्जेंट अक्षय चिकणे सर,होमगार्ड सैनिक, तरुण मंडळी, व सामाजिक कार्यकर्ते,  पुरुष व महिला मंडळींनी व सर्व स्तरातील रक्तदात्यांनी रक्तदान केले,विशेष म्हणजे या शिबीरामध्ये महिला वर्गाचा खुप मोठा सहभाग होता, व पती पत्नी सोबत अशा 5 जोडप्यानी रक्तदान केले.

या मध्ये महिला हेड कॉन्स्टेबल सौ.अंकिताई मंगेश घाटे, महिला पोलीस सौ.रंजनाताई उंबरकर,महिला पोलीस कु. माहेश्वरी वरचो,सौ. वैशालीताई अंकुश शिरभाते,कु.रक्षनंदा कविटकर, या व इतर महिला व पुरुष मंडळीनी, या शिबीरात अशा 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले,या शिबिराला  पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेशभाऊ विल्हेकर, विलासभाऊ वानखडे सामाजिक कार्यकर्ते, वैभवभाऊ वानखडे सामाजिक कार्यकर्ते  जांभा, कंपनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण यांनी  परिश्रम घेत, तसेच जितुजी चौबे सर,  ईम्रानभाई,चेतन इंगळे,,ऋषी वाघमारे,अक्षय चिकणे,सागर इंगळे  यांनी सहकार्य केले तसेच शिबिराला बरीच पोलीस स्टेशनची कर्मचारी मंडळी, मित्र मंडळी, व रक्तदाते हजर होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन चव्हाण, तर आभार प्रर्दशन विलास वानखडे यानी केले,


No comments:

Post a Comment