१ कोटी २४ लाखांचा पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन




प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तालुक्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भास् नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कळमनुरी तालुक्यासाठी १ कोटी २४ लाख ३८ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा आराखडा एप्रिल ते जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार तालुक्यातील ९७ पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून व नियोजनबद्ध पद्धतीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावांमध्ये ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून त्यासाठी ५२ लाख ३८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या माध्यमातून स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावांमध्ये विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा शक्य होणार नाही, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानुसार ७ गावांना १२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

एकूणच १०९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या कृती आराखड्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसणान्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

a

No comments:

Post a Comment