प्रामाणिक सेवा करण्यास कायम प्राधान्य दिले- डॉ दत्ता मोटेगावकर



 पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मोटेगावकर यांचा पदोन्नती निमित्त सत्कार 

प्रतिनिधी / गणेश ठाकरे, लासलगाव 

   पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर काम करीत असताना प्रामाणिक सेवा आणि तत्पर कार्य करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेक शेतकरी तसेच नागरिकांची चांगली साथ मिळाल्याने मोठा कार्यकाळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूर्ण केला भविष्यात अशीच गोसेवा करण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मोटेगावकर यांनी केले.

      निफाड, चांदवड आणि सिन्नर तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ दत्ता मोटेगावकर यांची पदोन्नतीवर नगर जिल्ह्यातील जामखेड येथे नियुक्ती झाल्यामुळे शहरातील संत सेना चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. 

       सन १९९६ पासून पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेले डॉ दत्ता मोटेगावकर यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये आपली सेवा दिली आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या सेवेमुळे लासलगाव ग्रामपंचायत यांनी लासलगाव गौरव पुरस्कार, पशुसंवर्धन विभाग नाशिक यांच्यातर्फे पशुसंवर्धन पुरस्कार, कृषी थाॅन नाशिक यांच्यातर्फे आदर्श पशुवैद्यक पुरस्कार मिळाले आहेत.

      यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ दत्ता मोटेगावकर यांना पदोन्नती बद्दल सदिच्छा व्यक्त करताना त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल बोलताना अनेक बाबींचा उल्लेख केला. शेतकरी बांधव,पशुपालक व ग्रामस्थ यांना ते शासकीय अधिकारी आहेत असे कधीही वाटलेच नाही. त्यांनी पशुसेवा देत असताना सामाजिक बांधीलकी जपली.

 शासकीय कामासोबत विधायक सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांनी त्यासाठी वेळ दिला. ऊण,वारा,पाऊस,रात्र,अपरात्र कोणत्याही वेळेस सहज उपलब्ध होऊन त्यांनी सेवा दिली.परिसरात त्यांना माऊली या नावानेच ओळखले जाते.खऱ्या अर्थाने हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे अनेक मान्यवरांनी मनोगतामधे भावना व्यक्त केल्या. पदोन्नती मिळाल्याबद्दल सदिच्छा देताना एक चांगला अधिकारी नाशिक जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यात जात असल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली. भविष्यात पुन्हा नाशिक जिल्ह्यात सेवेसाठी यावे अशा शुभेच्छा दिल्या. डॉ दत्ता मोटेगावकर यांचा सत्कार विश्वस्त मंडळाच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरविंद देसाई, सचिव अनिल वाघ, विश्वस्त अशोक जगताप, विजय वैद्य, शशिकांत महाले, भगवान संत, उषा मोटेगावकर, मंदाकिनी वाघ, अनिता देसाई यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आभार अनिल वाघ यांनी मांनले.


No comments:

Post a Comment