कळमनुरीत आक्रमक पवित्रा; पुतळा परिसराची तातडीने साफसफाई, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई
दिनेश पत्की कळमनुरी
शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील बांधकामातून उडणाऱ्या धुळीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व परिसराची दुरवस्था झाल्याने वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला.काम तात्पुरते बंद पाडताच ठेकेदाराकडून तातडीने पाण्याचे टैंकर बोलावून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली. कळमनुरी शहरातील शासकीय उपजिल्हारुग्णालयात औषधी भांडार इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत होती. वारंवार सूचना देऊनही रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला, अखेर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनपाहणी करत सुरू असलेले काम थांबवले. काम बंद होताच संबंधित कॉन्ट्रॅक्टरने पाण्याचे टँकर मागवून पुतळा व परिसर धुवून स्वच्छ केला. पुढील काळात धूळ उडूनये यासाठी पुतळ्याभोवती कापडी ताडपत्री लावून संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, बांधकामावर कार्यरत काही वाहनांकडे वैध कागदपत्रे व विमा नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित करत आरटीओ विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतरदंड आरटीओ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कॉक्रिट मिक्सर वाहनावर १४ हजार रुपये, तर जेसीबीवर ६ हजार रुपयांचा ठोठावला.
यापुढे परिसर अस्वच्छ झाल्यास जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला. या वेळी माजी तालुकाध्यक्ष राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, ॲड. रतन बलखंडे, समाधान पाईकराव आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment