जेऊर मध्ये गॅसच्या अवैध साठ्यावर पुरवठा निरीक्षक अधिकारी यांची मोठी कारवाई २० सिलेंडर जप्त
करमाळा, प्रतिनिधी – जितेंद्र चांदगुडे
तालुक्यातील जेऊर येथील इंदीरानगर परिसरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या LPG गॅस सिलेंडरवर पुरवठा विभागाने धडक कारवाई करत एकूण २० रिकामे सिलेंडर जप्त केले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले आहे की, मंगळवार दि.१७ मार्च रोजी मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे जेऊर येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या विजय बोराडे यांच्या कडे LPG गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळून आला. तपासणी दरम्यान संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच काही सिलेंडर आडव्या स्थितीत ठेवलेले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या या अवयव साठ्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत IOCL, HPCL व BPCL या कंपन्यांचे खालील प्रमाणे एकूण २० रिकामे LPG सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
14.2 कि.ग्रॅ. घरगुती सिलेंडर- 15 नग,
5 कि.ग्रॅ. घरगुती सिलेंडर – 3 नग,
5 कि.ग्रॅ. व्यावसायिक सिलेंडर – 2 नग
सर्व सिलेंडरचा पंचनामा करून जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण यांनी सांगितले आहे. सदर कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (सोलापूर), व जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे (सोलापूर) तसेच करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न मोतीराम चव्हाण व लिपीक-टंकलेखक उदय गोडगे यांच्या पथकाने पार पाडली.
No comments:
Post a Comment