शिंदोळ येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; युवक-युवतींमध्ये क्रीडाजागर वाढली
प्रतिनिधी सोयगाव... दिलीप मोरे...
सोयगाव तालुक्यातील मौजे-शिंदोळ येथे तालुका स्तरीय खुली क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मानसिक ताणतणाव कमी होऊन युवकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय यांच्या संकल्पनेतून आणि माय भारत, छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवा अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक स्तरावर सेवा संकल्प युवा मंडळ, शिंदोळ यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली.
स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण २७३ युवक व युवतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. युवक व युवती गटासाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक, रस्सीखेच तसेच कबड्डी या स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरा ११:४७ वाजेपर्यंत स्पर्धांचा थरार रंगला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्राम युवक कल्याण व क्रीडा समिती, आपदा मित्र समिती, सिद्धिविनायक मित्र मंडळ तसेच शंभूराजे मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना व्यसनमुक्त व निरोगी जीवनाकडे वळविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:
Post a Comment