वेतनश्रेणी तफावत व जुन्या पेन्शनसाठी उमरगा पंचायत समितीत लिपीक संवर्ग ची असहकार आंदोलन; काम बंदचा इशारा
उमरगा प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी
धाराशिव जिल्हा परिषद व अंतर्गत उमरगा पंचायत समिती कार्यालयातील लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 'असहकार' व 'कामबंद' आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. चौथ्या वेतन आयोग पासून ची वेतनश्रेणी तफावत दूर करावी आणि 1982 ची जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिपीक वर्गाने 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान काळी फित लावून काम केले असून, त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी पाठपुरावा आणि 23 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात 'बेमुदत कामबंद' आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रशासकीय कामे बंद असल्यामुळे नागरिकांच्या समस्या निर्माण झाली आहे
प्रमुख मागण्या:
चौथ्या वेतन आयोग पासून प्रलंबित वेतनश्रेणी तफावत दूर करणे.
1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणे.
पदोन्नती स्तर कमी करणे व तसेच पदनाम बदलकरणे अशा अनेक मागण्या मान्य करण्यात यावे अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला
या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल लिपीक संघटनेने दिलगिरी व्यक्त केली असली तरी, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा पवित्रा घेतला आहे.
व तसेच या आंदोलनाला उमरगा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला आहे अशी माहिती मिळाली आहे

No comments:
Post a Comment