जेऊर येथे आ. नारायण पाटील यांच्याउपस्थितीत एसटी आगारप्रमुखांची शनिवारी बैठक
करमाळा प्रतिनिधी :- जितेंद्र चांदगुडे
करमाळा मतदार संघातील वाढत्या दळणवळण समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जेऊर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक आमदार कार्यालयात पार पडणार असून प्रवासी, पालक आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीत करमाळा आगार प्रमुख वीरेंद्र होनराव व कुर्डूवाडी प्रमुख रत्नाकर लाड तसेच करमाळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नितीन कदम उपस्थित राहणार आहेत. करमाळा मतदारसंघातील खाजगी शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळेचे प्रतिनिधी यांना ही निमंत्रित करण्यात आले आहे.
करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांकडून एसटी बससेवेबाबत अनेक तक्रारी येत आहेत. काही मार्गावर बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आवश्यक बस सेवा मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षाचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी नियमित आणि वेळेवर बस सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे.
दरम्यान आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा आगारास दहा तर कुर्डूवाडी आगारास दहा नवीन बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय आणखी नवीन बसेस मंजूर करण्याची मागणी त्यांनी संबंधित विभागाकडे केले आहे. करमाळा व कुर्डूवाडी आगाराचे नूतनीकरण करण्यात आले असून जेऊर येथील नवीन बस स्थानकाचे काम सध्या वेगात सुरू आहे. तरीदेखील काही मार्गावरील बस सेवा बंद असल्याने विशेषता करमाळा बसस्थानकाहुन करून पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा जाणाऱ्या काही गाड्या बंद झाल्याने व्यापारी व नागरिकांतुन नाराजी व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीत प्रवासी व पालकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा आमदार नारायण पाटील यांचा मानस आहे. त्यामुळे संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत. असे आव्हान आमदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जेऊर येथे आमदार नारायण पाटील यांच्याउपस्थितीत एसटी आगारप्रमुखांची शनिवारी बैठक

No comments:
Post a Comment