योग्य बाजारभाव मिळणेसाठी शेतकरी बांधवांनी द्राक्षेमणी हा शेतीमाल अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्री करावा

 


प्रतिनिधी , गणेश ठाकरे लासलगाव 

द्राक्षेमणी हा शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांनी योग्य बाजारभाव मिळावे यासाठी बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल विक्रीस आणावा असे आवाहन लासलगांव बाजार समितीच्या सदस्य मंडळाने नैताळे व मानोरी खुर्द येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.

निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणाऱ्या द्राक्षेमण्यांना योग्य बाजारभाव मिळणेसाठी बाजार समितीने कार्यक्षेत्रात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द इ. ठिकाणी खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे.

त्यानुसार नैताळे केंद्रावर सदस्य राजेंद्र बोरगुडे यांचेसह उपस्थित सदस्य मंडळाच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्‌चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर गौतम बोरगुडे यांचा द्राक्षेमणी रू. 71/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 74 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 15/-,जास्तीत जास्त रू. 71/-, सरासरी रू. 35/- प्रति किलो याप्रमाणे होते.

तसेच मानोरी खुर्द (फाटा) केंद्रावर उपसभापती संदीप दरेकर यांच्यासह उपस्थित सदस्य मंडळाच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्‌चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर वसंत वावधाने यांचा द्राक्षेमणी रू. 71/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 45 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 15/-, जास्तीत जास्त रू. 71/-, सरासरी रू. 45/- प्रति किलो याप्रमाणे होते.

लिलाव शुभारंभ प्रसंगी दरेकर व बोरगुडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नैताळे व मानोरी खुर्द (फाटा) परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. 28 मार्च, 2005 पासुन नैताळे व दि. 03 फेब्रुवारी, 2024 पासुन मानोरी खुर्द (फाटा) येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली आहे. गेल्या 20 ते 21 वर्षात या केंद्रांस शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे द्राक्षेमण्यांची खरेदी करीत असे. स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लुट तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असे. त्यामुळे बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नैताळे येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन एक ते दीड कोटी रूपयांची उलाढाल होते. नैताळे केंद्रावर सन 2005 ते 2025 पर्यंत 11.52 लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 20.41 कोटी रूपयांची उलाढाल याठिकाणी झाली आहे. तर मानोरी खुर्द (फाटा) केंद्रावर सन 2024 ते 2025 पर्यंत 1.23 लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 14.73 लाख रूपयांची उलाढाल झाली आहे. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी विक्रीस प्राधान्य देतात.

           यावेळी बाजार समितीचे सदस्य छबुराव जाधव, भिमराज काळे, महेश पठाडे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, वाल्मिक बोरगुडे, तानाजी बोरगुडे, सुनिल बोरगुडे, दत्तात्रय भवर, आण्णासाहेब बोरगुडे, सोपान बोरगुडे, एकनाथ जाधव, देविदास बोरगुडे, रवि फडे, सुनिल काळे, भास्करराव ढोक, उत्तमराव जगताप, सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल पांडुरंग खैरे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, हिरालाल सोनारे, पंकज होळकर, द्राक्षेमणी खरेदीदार बापु धरम, विष्णुपंत गायकर, सुधीर मोरे, दादाभाई शेख, हैदर पठाण, अत्तर कुरेशी, इम्रान शेख, जाकीर शेख, पप्पु मोमीन, शकील शेख, मारूफ शेख, अश्पाक शेख, समीर शेख, अश्पाक सैय्यद, भुसार व तेलबिया व्यापारी दिपक साबळे, सुभाष शिंदे, ईश्वर शिंदे, नामदेव वाळुंज, निखील घाडगे, योगेश जाधव, मानोरी खुर्द (फाटा) खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संदीप निकम, नैताळे खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी वाल्मिक खालकर, वाल्मिक जाधव, रामदास गायकवाड, रामनाथ गोळे, सचिन वाघ, देवेंद्र होळकर, शुभम पायमोडे, नितीन जाधव, मुकूंद शिंदे, प्रतिक घायाळ, राहुल गभाले, हरी गभाले, रोहीत खैरनार यांचेसह परीसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment