चांदोरी येथे गोदावरी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
वार्ताहर :- गणेश ठाकरे लासलगाव
चांदोरी येथील रहिवासी रवींद्र गंगाराम झुरडे (वय ३८) यांचे गोदावरी नदीत पाण्यात पडून दुर्दैवी निधन झाले. सदरील प्रेत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आले.मिळालेल्या माहितीनुसार, झुरडे हे गोदावरी नदी परिसरात असताना अचानक तोल जाऊन नदीत पडले. गोदावरी नदीतील पानवेली मध्ये झुरडे यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने शोधकार्य सुरू केल,
या घटनेची नोंद सायखेडा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. घुगे , पोलिस उपनिरीक्षक पी. के.अढांगळे, पोलिस हवालदार नाईक , पोलिस अंमलदार गांगुर्डे व शोध कार्य करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख व किसन जाधव , फकिरा धुळे ,वैभव जमधडे, विलास गांगुर्डे, सुरज पगारे, सोमनाथ कोटमे, सचिन कांबळे , राजेंद्र टर्ले व पोलिस पाटील अनिल गडाख, ग्रामपालिका सरपंच विनायक खरात , सदस्य रवींद्र बदादे व ग्रामस्थ उपस्थित होते. मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments:
Post a Comment