कु. प्राजक्ता चेके हिची कार्यकारी सहाय्यक म्हणून नियुक्ती.
टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर
टेंभुर्णी येथील नामांकित नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित. श्रीमती. जे. बी. के. विद्यालयाची विद्यार्थीनी. कु. प्राजक्ता भास्करराव चेके हिची नुकतीच मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (के. एम.)कार्यकारी सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. प्राजक्ता चेके हीने महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून, आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
शालेय जीवनात अतिशय हुशार, नम्र मेहनती असणारी प्राजक्ता चेके हीने लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले होते. टेंभूर्णी येथील श्रीमती. जे. बी. के. विद्यायाचे माजी मुख्याध्यापक भास्करराव चेके सर यांची ती कन्या असुन, तिच्या या नियुक्तीचे व यशस्वी वाटचाली साठी नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष.जमिर शेख सर,सचिव. सत्यनारायण सोनी कोषाध्यक्ष. सुभाष राठी,जेष्ट संचालक मधुकर निकम, संचालक विश्वनाथ सांगुळे, प्रदिप मुळे, प्रदिप काबरा प्रा. डि. एस. देशमुख, पंजाबराव सोळंके,ऐड. प्रेमसुख काबरा, मुख्याध्यापक. विष्णु जाधव, सखाराम बोरकर, प्रा. मधुकर झटे, दिलीप उबरहंडे, माजी मुख्याध्यापक. लक्ष्मीकांत बुकदाने, नंदकुमार काळे, गणेश सावसक्के, संजय कुलकर्णी,रमेश इंगळे, भिवसन ससाणे, दत्ता उखर्डे, कैलास भुतेकर, समाधान कांबळे,दिनकर उखर्डे, राजेश शेवाळे, प्रा. सुनील बनसोडे, प्रा.डॉ.अरूण आहेर, प्रा. रामदास भांगे,प्रा. कैलास जाधव, प्रा.गजानन धोटे, प्रा. डॉ. आनंद जाधव, वासुदेव क्षिरसागर, उज्वला आवटी,मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, एफ.ए.शेख, माधुरी पाटिल, विजया लंबे,नागोराव देशमुख, दिपक देशमुख, आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment