विरार येथे चतुरबेट क्रिकेट मंडळाच्या वतीने भव्य दिव्य ओव्हरर्म क्रिकेट स्पर्धेचे चे आयोजन
स्वराज्य फाऊंडेशन या संस्थेला २५०००/- रुपये धनादेश सुपूर्द करून समाज कार्याचा आयोजकांचा अनोखा संदेश.
प्रतिनिधी - सुरेंद्र जाधव
विरार - दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी नवचैतन्य युवक मंडळ चतुरबेट मुंबई अंतर्गत श्री. भैरी नवलाई क्रिकेट मंडळाच्या वतीने विरार म्हाडा मैदान येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धे मध्ये आयोजकांनी " फक्त क्रिकेटच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपूया " या ब्रिदवाक्याखाली क्रिकेट चे आयोजन केले. संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात चतुरबेट ची क्रिकेट स्पर्धा हि मानाची स्पर्धा समजली जाते, त्यामुळे येथे तालुक्यातील बहुतेक संघ हजेरी लावण्यास उत्सुक असतात, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३३,३३३ रुपये, द्वितीय पारितोषिक २२,२२२ रुपये, त्रितिय पारितोषिक ११,१११ ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करून प्रथम पारितोषिक रुळे वैभव या संघाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक अहिर ब व त्रितीय पारितोषिक चतुरबेट या संघानी पटकावले, विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आयोजकांनी या स्पर्धेतुन मिळालेली रक्कम सामाजिक कार्यामध्ये गरजवंत विद्यार्थी,अपंग,गंभीरदृष्ट्या आजारी रुग्ण , निराधार महिला व वृद्धांच्या सेवेत उपयोगी पडावी यासाठी या गावाने महाबळेश्वर तालुक्यात १०५ गावांमध्ये प्रभावीपणे काम करणारी स्वराज्य फाउंडेशन ही संस्था निवडली.सामाजिक जाणिवेने व विश्वासाने स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याचा आलेख पाहून चतुरबेट गावाने रुपये.२५०००/- (पंचवीस हजार) चा धनादेश स्वराज्य फाऊंडेशनला सुफर्द केला
नवचैतन्य युवक मित्र मंडळ, चतुरबेट हे मंडळ यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली समाजसेवेची ओळख निर्माण केली आहे. गरजू कुटुंबांना मदत, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, आपत्तीग्रस्तांसाठी सहाय्य, तसेच युवकांमध्ये सकारात्मक विचार व क्रीडावृत्ती रुजविण्यासाठी मंडळाने सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचेच हे आयोजन एक उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
स्पर्धेला खेळाडू, क्रीडाप्रेमी प्रेक्षक, ग्रामस्थ, स्वराज्य फाउंडेशनचे कार्यकर्ते,शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत चुरशीचे व शिस्तबद्ध सामने रंगले.
क्रिकेटमधूनदेखील समाजसेवा करता येऊ शकते : या क्रिकेट स्पर्धेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख संघ, नामवंत खेळाडू, क्रिकेटप्रेमी,ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले . ही स्पर्धा केवळ एक क्रीडा स्पर्धा न राहता, समाजहितासाठी उभ्या राहिलेल्या एकात्मिक प्रयत्नाचं प्रतीक ठरले . दरम्यान, विरार येथील ही क्रिकेट स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याला एक प्रेरणादायी स्पर्धा ठरली . स्वराज्य फाऊंडेशन या संस्थेसाठी अशा प्रकारे निधी उभारणं हा प्रकार दुर्मीळ असून, ही स्पर्धा सिद्ध करते की खेळ आणि समाजकार्य एकत्र आल्यास मोठा आणि सकारात्मक बदल समाजात घडवता येतो.

No comments:
Post a Comment