कळमनुरीत अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

 


 प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

 कळमनुरी शहरामध्ये गेल्या २१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदाही मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे. या धार्मिक परंपरेला आजही कळमनुरीतील युवक, माता-भगिनी तसेच सर्व गावकरी मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्वजग एकजुटीने या अध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होत आहेत.

अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आज शनिवारदिनांक ७ फेब्रुवारी रोजी झाली असून या सप्ताहाची समाप्ती दिनांक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कालावधीत दररोज विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहादरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ तसेच कीर्तन असे कार्यक्रम भक्तांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला असून हरिनामाच्या गजराने कळमनुरी शहर दुमदुमून गेले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहामुळे सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि संस्कृतीचे जतन होत असून ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, अशी भावना आयोजक व भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment