मुदगलेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी रांगा हजारो भाविकांनी घेतले दर्शन




 प्रतिनिधी 

पाथरी तालुक्यातील मुदगल हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून राज्य सह परराज्यात सुप्रसिद्ध आहे परराज्यांतील भाविक दोन दिवसांपासून मंदिर परिसरात आले तर मुदगल पंचक्रोशीतील श्रध्दास्थान असलेल्या पाथरी तालुक्यातील मुदगलेश्वर मंदिरमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पहाटे पासून मुदगलेश्वरांस अभिषेक नाम जप भजन जय जय मुदगलेश्रर या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.भाविकांना दर्शन सुरुळीत घेण्यासाठी मुदगल येथील युवकांनी खुप मेहनत घेतली  पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी मोठं मोठ्या रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात खाद्यपदार्थ खेळणी व पूजन साहित्यांचे स्टाॅल मांडले होते मुदगल येथील ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना उपवासाचे पदार्थ मोफत देण्यात आले राजे मल्हार मंडळ मुदगल येथील युवकांनी भाविकांना चाय चे मोफत वाटप करण्यात आले होते भाविकांना उन्हापासून संरक्षण व वाहने पार्किंग सुविधा करण्यात आली होती भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पाथरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांना आरोग्य सेवेसाठी वाघाळा येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रांचे डाॅक्टर यावेळी उपस्थित होते 

No comments:

Post a Comment