MPSC परीक्षेमध्ये दत्तकला इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी किरण पिसाळ याचे घवघवीत यश



करमाळा प्रतिनिधी-जितेंद्र चांदगुडे 


दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय झोळ सर व दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा आदरणीय माया झोळ मॅडम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र 85 Rank उत्तीर्ण झाल्याबद्दल किरणचा सन्मान करून त्याला प्रेरणा दिली. आदरणीय झोळ सरांनी ज्ञानाची कदर करत किरणला एवढ्यावरच न थांबता पुढे चांगला अभ्यास करून तू आणखी चांगले यश मिळवू शकतोस जिद्द ठेव, चिकाटीने अभ्यास कर असे म्हणत शुभेच्छा दिल्या व पाठीवरती कौतुकाची थाप टाकली. विचारांची ताकद असणाऱ्या आणि समाज घडवण्याची जिद्द असणाऱ्या आदरणीय झोळ सर व आदरणीय माया झोळ मॅडम हे दत्तकला शिक्षण संस्थेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे नेहमीच कौतुक करतात व विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा व प्रेरणा देतात.

यावेळी उपस्थित संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ.नंदा ताटे मॅडम,दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सौ.सिंधू यादव मॅडम दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या इन्चार्ज खाडे मॅडम यांनी कृषी अधिकारी किरण पिसाळला भरघोस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment