पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून माळी गली येथील महिलांनी न . पा. कार्यालयाला घातला घेराव..
दिनेश पत्की कळमनुरी -
कळमनुरी येथील माळी गली येथील महिलांनी सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवरून नगरपरिषद कार्यालयात जोरदार निदर्शने केली. अनेक दिवसांपासून नळांमध्ये पाणी नसल्याने नाराज झालेल्या महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि अभियंत्यांना घेराव घालून नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून माळी गली परिसरात पिण्याचे पाणी नसल्याने दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. पाण्यासाठी त्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे आणि घरातील कामेही विस्कळीत होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करत महिलांनी मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन सादर केले. संगीता गाभणे, रंजनी गा भणे, वैष्णवी गाभणे यांच्यासह माळी गल्लीतील अनेक महिला रहिवासीयांनी सहभाग नोंदवला या
आंदोलनात सारिका गाभणे, छाया गाभणे, शिवलीला देवकर, चित्रा गाभणे, लता गुंजकर, गोदावरी गाभणे, योगिता गाभणे, कांचन गाभणे आदी उपस्थित होते. परिस्थिती पाहून कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्तासह उपस्थित होते. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला.

No comments:
Post a Comment