मुंबईत मल्लिकार्जुन मकरंदगड सेवा मंडळाची वार्षिक सभा व हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न



प्रतिनिधि - सुरेंद्र जाधव 

मल्लिकार्जुन मकरंदगड सेवा मंडळ (घोणसपूर–मुंबई) आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानेरविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी शारदाश्रम विद्यामंदिर, दादर, मुंबई येथे "वार्षिक सर्वसाधारण सभा" तसेच महिलांसाठी "हळदी-कुंकू समारंभ" मोठ्या उत्साहात पार पडला.सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने मुंबई येथे प्रथमच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे संस्थापक श्री. धोंडीबा हरिबा जंगम मंडळातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. बाळू सदाशिव जंगम, श्री. बी. एन. जंगम (स्वामी) व श्री. कोंडीबा गणपत जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश कोंडीबा जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सौ. लक्ष्मी बाबू जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच देवी श्रीमहालक्ष्मी यांच्या प्रतिमेस,सौ. रूपाली संजय जंगम यांच्या हस्ते आणि श्री शिवशंभू महादेव यांच्या प्रतिमेस मंडळाचे उपाध्यक्ष श्री. महादेव संभाजी जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री. प्रकाश अनाजी जंगम यांनी शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने केले.कार्यक्रमस्थळी सौ. मानसी महेश जंगम, सौ. वैशाली प्रकाश जंगम व सौ. स्नेहा सचिन जंगम यांनी आकर्षक फुलांची सजावट केली.

सर्व महिलांना हळदी-कुंकू व वाण स्वरूपात भेटवस्तू सौ. मंजू महादेव जंगम यांच्या सौजन्याने देण्यात आल्या. फुलांची सजावट पुष्पहार व पुष्पगुच्छासाठी सौ. आरती अरुण जंगम यांनी सहकार्य केले.तिळ-गूळ व लाडू सौ. सुवर्णा अशोक जंगम यांच्या कडून देण्यात आले. या कार्यक्रमस्थळाची व्यवस्था सौ. मंदा आनंद जंगम यांच्यातर्फे करण्यात आली.तसेच उपस्थित सर्व मंडळ सदस्य, महिला व लहान मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सौ. अनुराधा रोशन जंगम यांच्या सहकार्याने सुयोग्यरीत्या पार पाडली.

यावेळी सौ. सुगंधा कोंडीबा जंगम, सौ. वासंती गंगाराम जंगम, सौ. संध्या रवींद्र जंगम, सौ. रेश्मा मनीष जंगम, सौ. सुवर्णा सागर जंगम, श्रीमती अर्चना गणेश जंगम, कु. रेणुका आनंद जंगम, कु. मंजू अशोक जंगम तसेच उपस्थित बालगोपालांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.सर्व घोणसपूर ग्रामस्थ, महिला वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.यापुढे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. रोशन बाबू जंगम यांनी दिली.


No comments:

Post a Comment