बार्शीत आ. दिलीप सोपल व महा आघाडी यांना मतदारांनी नाकारले



बार्शी प्रतिनिधी -वैशाली बाबासाहेब ढगे 

बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद ६ जागेसाठी आणि पंचायत समितीच्या १२ जागेसाठी मतदान मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.या निवडणुकीमध्ये आमदार दिलीप सोपल व महा आघाडीला मतदाराने नाकारल्याचे दिसुन आले आहे.माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे वर्चस्व असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकिमध्ये सिध्द झाले आहे.

       जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १८ च्या १८ जागांवर भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. यावरून आमदार दिलीप सोपल यांनी फक्त आमदारकीच मिळवली आणि सगळं काही गमवल्याचं दिसुन येत आहे या विरूद्ध राजाभाऊ राऊत यांनी फक्त आमदारकीच गमावली आणि सर्व काही कमावल्याची चर्चा होत आहे.घवघवीत यशानंतर गुलाल उधळून जल्लोश साजरा केला व बार्शीतील पांडे चौकात भाजपचे राजाभाऊ राऊत यांनी सभा घेऊन मतदारांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment