माजी आ. राजाभाऊ राऊत यांनी निवडणुकीच्या यशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घेतली भेट



बार्शी प्रतिनिधी -वैशाली बाबासाहेब ढगे 

मा.आ. राजाभाऊ राऊत यांनी आज विश्रामगृह, सोलापूर येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांची भेट घेतली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने साहेब, भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने ६८ पैकी ३८ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवल्याबद्दल मा.आ.राजाभाऊ राऊत यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन सत्कार करून अभिनंदन केले. बार्शी तालुक्यातदेखील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे ६ पैकी ६ उमेदवार तसेच पंचायत समितीचे १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाल्याबद्दल पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले.बार्शी तालुक्यातील मतदारांचे मनापासून आभार मानले. येणाऱ्या काळामध्ये बार्शी तालुक्याला विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी दिला.

तसेच सोलापूर महानगर पालिका निवडणुकीमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा देखील मा.आ. राजाभाऊ राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment